“माझे राजगुरूनगर, स्वच्छ राजगुरूनगर’

राजगुरूनगर – “माझे राजगुरूनगर, स्वच्छ राजगुरूनगर’ या अभियांनातर्गत राबविण्यात येणाऱ्या जनजागृती अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. राजगुरूनगर नगर परिषद, कारपे संस्था औरंगाबाद, जानकीदेवी बजाज संस्था यांच्या संयुक्‍त विद्यमाने शहरात स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

शहरातील वैष्णपायन आळी येथे जनजागृती उपक्रम घेण्यात आला त्याची सुरुवात नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, उपनगराध्यक्षा वैशाली बारणे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, स्वच्छता समितीच्या सभापती संपदा सांडभोर, नगरसेविका रेखा क्षोत्रिय, नगर परिषद आरोग्य अधिकरी चारुबाला हरडे, स्वच्छता जवान कैलास सांडभोर, कारपे प्रतिनिधी जितेंद्र भाले, मल्हारी पंडित, रेश्‍मा ढावरे, पुजा पिंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात येथील ज्येष्ठ नागरिक प्रमोद कृष्णा देशमुख यांच्या हस्ते कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीला पुष्पहार घालून व नारळ फोडून करण्यात आली.कारपे संस्थेचे समन्वयक सुरेश घोरपडे यांनी कचरा वर्गीकरनाचे प्रात्यक्षिक (डेमो) दाखवले. यावेळी नगर परिषद आरोग्य अधिकारी चारुबाला हरडे, स्वच्छता जवान कैलास सांडभोर, कारपे प्रतिनिधी जितेंद्र भाले, मल्हारी पंडित, रेश्‍मा ढावरे, पूजा पिंगळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते

Leave A Reply

Your email address will not be published.