खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा कॉंग्रेसवर अप्रत्यक्षरीत्या पैसे वाटपाचा आरोप
नवी दिल्ली : एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी कॉंग्रेसवर अप्रत्यक्षरित्या मतदारांना पैसे देत असल्याचा आरोप केला आहे. हा आरोप करत असताना त्यांनी कॉंग्रेसवाल्यांकडेखूप पैसा आहे, तो घ्या आणि मला मतदान करा. तसेच, मी कॉंग्रेसवाल्यांना दर वाढवण्यास सांगतो. माझी किंमत केवळ दोन हजार नाही, त्यापेक्षाही जास्त आहे, असे देखील ओवेसींनी म्हटले आहे.
Asaduddin Owaisi, on violence in Telangana’s Bhainsa: Yesterday’s incident is condemnable. I demand the CM to take action against all culprits. I also demand him to provide compensation to everyone who suffered losses. I appeal to the people of Bhainsa to maintain peace. (13.01) https://t.co/Ys4vVnx2fg
— ANI (@ANI) January 14, 2020
कॉंग्रेसमधील लोकांकडे खूप पैसा आहे, तो घ्या. तुम्हाला तो माझ्यामुळे मिळेल. फक्त मला मतदान करा. जर ते तुम्हाला पैसे देत असतील तर ते घ्या. मी कॉंग्रेसला दर वाढवण्यास सांगतो. माझी किंमत केवळ दोन हजार नाही तर त्यापेक्षाही कितीतरी जास्त आहे, असं ओवेसी म्हणाले आहेत.
तेलंगणमधील भैंसा येथे काल दोन समुदायांमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेवर देखील ओवेसींनी भाष्य केले आहे. ही घनटना निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, मी मुख्यमंत्र्यांकडे सर्व दोषींविरोधात कारवाईची मागणी करतो याचबरोबर मी ही देखील मागणी करतो की ज्या लोकांचे यामध्ये नुकसान झाले आहे, त्यांना नुकसानभरपाई दिली जावी. मी भैंसा येथील नागरिकांना शांतता राखण्याचेही आवाहन करतो. असे देथील ओवेसी म्हणाले आहेत. दरम्यान, तेलंगणमधील भैंसा या ठिकाणी दोन समुदायांमध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर सोमवारी रात्री उशीरा 13 ते 15 जानेवारीपर्यंत कलम 144 लावण्यात आले आहे.