माझे मत नेहमीच तुम्हाला असेल – श्रुती हसन

मुंबई – दाक्षिणात्य ‘सुपरस्टार’ कमल हसन यांनी काही दिवसांपूर्वीच राजकीय क्षेत्रात आपले आगमन केले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या वेगळ्या राजकीय पक्षाची ‘मक्कल निधी मय्यम’ स्थापना देखील केली होती. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडु आणि पुडुचेरीमधील लोकसभेच्या सर्व ४० जागांवर आपल्या पक्षाचा उमेदवार देणार असल्याचे कमल हसन यांनी सांगितले होते. कमल हसन यांची मुलगी आणि बॉलिवूड मधील अभिनेत्री श्रुती हसन हीने देखील आपल्या ट्विटर खात्यावरून वडिलांना पाठिंबा दर्शवला आहे.

श्रुती हसनने वडील कमल हसन यांचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटर खात्यावरून शेअर करत माझे मत नेहमीच तुम्हाला असेल असे म्हंटले आहे. तसेच दुसऱ्या एका ट्विट मध्ये श्रुती हसनने वडिलांवर आपल्याला गर्व असल्याचे म्हंटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.