प्रिया बेर्डे यांचा सूर्यदत्ता ग्रुपच्या वतीने सत्कार
पुणे – “पुण्याशी माझे नाते खूप जुने आहे. माझे पती लक्ष्मीकांत बेर्डे आणि आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते “लक्ष्या’ यांच्या चित्रपटांना व नाटकांना पुणेकर रसिकांनी दिलेली दाद अविस्मरणीय आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी केले.
बेर्डे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया, अभिनेता अभिनय बेर्डेसह आदी उपस्थित होते. यावेळी करोना पार्श्वभूमीवर संस्थेने समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुणे जिल्हा सांस्कृतिक विभागातर्फे डॉ. संजय चोरडिया यांनाही गौरविण्यात आले.
प्रिया बेर्डे म्हणाल्या, “माझ्या दोन्ही मुलांचे शिक्षण पुण्यातील महाविद्यालयात झाले. कलाकारांच्या अडचणी सोडविण्यासह त्यांना पोषक वातावरण उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
डॉ. संजय चोरडिया म्हणाले, संस्थेत परफॉर्मिंग आर्टस, बीसीएस ऍनिमेशन हे अभ्यासक्रम असून, गेल्यावर्षी सूर्यदत्ता प्रोडक्शन्स सुरू केले आहे. तरुणांना अभिनयाचे धडे देण्यासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये आपल्यासारख्या ज्येष्ठ व अनुभवी कलाकारांचे मार्गदर्शन आवश्यक आहे.