नवी दिल्ली – रेप इन इंडिया विधानावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. परंतु, मी मरणे पसंत करेल पण माफी मागणार नाही, असे प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी दिले आहे. रामलीला मैदानावर नागरिकत्व सुधारणा विधेयकविरोधात आणि महिलांवरील अत्याचार असे अनेक मुद्दे घेऊन काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात रॅली काढली आहे.
राहुल गांधी म्हणाले कि, माझे नाव राहुल सावरकर नसून राहुल गांधी आहे, त्यामुळे मी माफी मागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, माफी मागायची असेल तर मोदींचे असिस्टंट असलेल्या अमित शहांनी माफी मागावी, असेही त्यांनी म्हंटले आहे. राहुल गांधींनी २०१४ मधील मोदींच्या एका व्हिडिओचा संदर्भ देत माफी मागणार नसल्याचे म्हंटले आहे.
Rahul Gandhi, Congress: No one from Congress will apologise. It is Narendra Modi who should apologise. He should apologise to the nation. His assistant Amit Shah should apologise to the nation. I will tell you why they should that. https://t.co/Q18DVDJSMr
— ANI (@ANI) December 14, 2019
तर देशाची अर्थव्यवस्था मोदींनी नष्ट केली असून जे काम शत्रुंनी केलं नाही ते मोदींनी केलं आहे. गेल्या ४५ वर्षात सर्वात मोठी बेरोजगारी मोदी सरकारच्या काळात आली आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी भाजपवर केली.