पिंपरी –जुन्या भांडणाचा राग मनात धरून पीडित महिला व तिच्या दोन मुलींना कपडे फाडून मारहाण करत शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 47 वर्षीय पीडित महिलेनी फिर्याद दिली आहे. नाना सोनवणे (रा. थेरगाव) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी सोनवणे यांच्यात जुना वाद आहे. फिर्यादी यांचा भांडी मंडईमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपीने फिर्यादी यांच्या गाळयाजवळ जाऊन अश्लील वर्तन केले व फिर्यादी व त्यांच्या दोन मुलींना हाताने मारहाण करत त्यांचे कपडे फाडले. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.