पिंपरी – शहरातील मालमत्ता धारकांनी मालमत्ता कराची आकारणी करण्यासाठी स्वत: मालमत्तेची नोंदणी केल्यास महापालिका सामान्य करात 5 टक्के सवलत देणार आहे. यासाठी महापालिका ‘माझी मिळकत, माझी आकारणी’ या योजनेद्वारे स्वयंस्फूर्तीने मालमत्ता कराची नोंदणी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सवलत दिली जाणार आहे. मालमत्ताधारकांने महापालिकेच्या संकेतस्थळावर नोंदणीसाठी अर्ज करुन आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन महापालिकेने केले. अशा प्रकारची योजना राबविणारी देशातील पहिली महापालिका असल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी केला आहे.
…अशी करावी लागणार ऑनलाइन नोंदणी
नोंदणीसाठी मिळकतधारकाने स्वत: महापालिकेच्या ुुु.लिालळपवळर.र्सीें.ळप या संकेत स्थळावरील नागरिक या टॅबवर क्लिक करून त्यातील “माझी मिळकर माझी आकारणी पेज उघडावे. त्यानंतर, न्यू असेसमेंट हा पर्याय निवडावा. त्यातील सेल्फ असेसमेंट ऑफ प्रॉपर्टी टॅक्स हा संपूर्ण फार्म भरावयाचा आहे. त्यामध्ये, विचारलेली आवश्यक माहिती भरून ीराश री रर्लीेंश वर क्लिक करून मिळकत असलेले क्षेत्रीय कार्यालय निवडायचे आहे. त्यानंतर, मिळकतींचा प्रकार नमूद करून पार्किंग एरिया या पर्यायावर होय किंवा नाही यावर क्लिक करायचे आहे. तसेच, विचारलेली अन्य माहिती भरून तपशील जोडायचा आहे.
तात्पुरती मालमत्ता कर यावर क्लिक करून नेक्स्ट बटन दाबल्यानंतर अर्ज भरला जाईल. अर्ज भरल्यानंतर महापालिकेच्या करसंकलन विभागामार्फत मेलद्वारे विशेष नोटीस काढण्यात येते. विशेष नोटीस मान्य असल्यास कर आकारणी मान्य होऊन पैसे भरण्याचा पर्याय येतो. यामध्ये अर्ज क्रमांक हाच तात्पुरत्या स्वरुपात मिळकत आयडी असतो. नंतर संबंधित विभागामार्फत प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून नवा मिळकत आयडी दिला जातो. कर आकारणी अमान्य असल्यास पुढील सुनावणीची प्रक्रिया पार पाडण्यात येते.
नव्याने होणारी बांधकामे, वाढीव बांधकाम, वापरात बदल अशा विविध प्रकारच्या मालमत्ता सतत वाढत असतात. या मालमत्तांना प्राधान्याने कर आकारणी होणे आवश्यक आहे. मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी मालमत्ताधारक स्वत: महापालिकेच्या संकेतस्थळावरील मालमत्ता नोंदणीसाठी अर्ज करत असेल. तर, अशा मालमत्तांना सामान्य करात 5 टक्के सवलत पहिल्या वर्षाकरिता दिली जाणार आहे. त्यासाठी मालमत्ताधारकाने स्वत:हून महापालिका संकेतस्थळावर नोंदणीसाठी अर्ज करुन कर आकारणी संबंधित आवश्यक कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे.
मालमत्ता धारकांना स्वतः मालमत्तेची नोंदणी करता येणार आहे. असे केल्यास मिळकतधारकास सामान्य करात पाच टक्के सवलत देण्यात येणार आहे. अशी योजना राबवणारी पिंपरी-चिंचवड देशातील पहिली महापालिका आहे. मे, जून आणि जुलै या तीन महिन्यात ही प्रायोगिक तत्वावर योजना राबविण्यात येणार आहे. नागरिकांचा प्रतिसाद पाहून योजनेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.
– निलेश देशमुख, सहाय्यक आयुक्त,
कर संकलन विभाग