मुंबई- माझा होशील ना मालिका महत्वाच्या टप्प्यावर आहे. मालिकेत सध्या प्रेमाचे वारे वाहताना दिसते आहे. आदित्य अखेर सईकडे प्रेमाची कबुली देणार असल्याचं प्रोमोमध्ये दाखवलं आहे. ही मालिका प्रेमाच्या वळणावर असल्याने प्रेक्षकांल लक्ष वेधून घेत आहे.
या मालिकेती आदित्या म्हणजेच विराजस कुलकर्णीची ही पहिलीच मालिका आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक सीव त्यांच्या भवितव्य घडणारे आहे. मालिका महत्वाच्या वळणावर असताना त्याने मालिकेतील आवडत्या सीनच्या स्क्रीप्टचा फोटो चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. त्या फोटोवर तो व्यक्तही झाला आहे.
‘बरोब्बर एका महिन्यापूर्वी, संवादाच्या त्या ओळी असलेलं स्क्रिप्ट माझ्या हाती आलं, ज्यांची मी मनापासून वाट बघत होतो. माझा होशील ना च्या पहिल्या एपिसोड पासून ज्या दिशेने सगळं चालू होतं, त्याचं मर्म ह्या मोजक्या शब्दांमध्ये, ह्या साक्षात्कारामध्ये, आदित्यच्या मनामध्ये सापडलंय. अधून मधून हातामध्ये असा सीन लिहून येतो जो फक्त एक प्रसंग नसतो. आपल्या पात्राच्या प्रवासात मनाने गुंतलेल्या प्रत्येक प्रेक्षकासाठी एक सुखाचा निःश्वास असतो. हा फोटो मी तेव्हाच काढून ठेवला होता – ह्या कथेचा, पात्राचा, आपल्या ह्या प्रवासाचा एक मैलाचा दगड म्हणून. कारण आता सगळंच बदलणार आहे. रस्त्यात खूप वळणं आणि अडथळे येणारच, पण आजची रात्र मात्र आपण आदित्य बारोबर साजरी करूयात…’, असं त्याने पोस्टवर लिहीलं आहे.
दरम्यान, प्रेमाची कबूली दिल्यानंतर सई आणि आदित्याच्या नात्याला कोणतं वळण येईल, सुयशचं काय होईल, सईचे आई बाबा या नात्याबाबत काय म्हणतील? हे पाहणं महत्वाचं आहे.
View this post on Instagram