माझी ‘काकासाहेब शिंदे’ या भावाला मनापासून श्रद्धांजली! पंकजा मुंडे भावूक

भावना, पीडा बाजूला ठेवून केवळ राजकीय भांडवल करणं मला कधी जमतच नाही… 

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सोशल मिडीयावर एक भावनिक पोस्ट केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षण व इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहेत. सोमवारी काकासाहेब शिंदे या आंदोलकाने जलसमाधी घेतल्याने आंदोलनाला राज्यभरात हिंसक वळण लागले. 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, “माझ्या महाराष्ट्रातील माझा एक भाऊ ‘काका साहेब शिंदे’ याने स्वतःचा जीव गमावला आहे, एका आईच्या पोटचं लेकरू गेलं, तिच्या गळ्यातला ताईत गेला, त्या माऊलींच्या दुःखाची कल्पना ही कोणी करू शकत नाही. मी सर्व सुन्न होऊन बघत आहे आणि अगदी जाणून बुजून प्रतिक्रिया देण्याची घाई ही केली नाही” अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  

वाचा पंकजा मुंडेंची संपूर्ण फेसबुक पोस्ट… 

https://www.facebook.com/PankajaGopinathMunde/posts/1807012512717635

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)