माझ्या वडिलांना, ज्येष्ठ नेत्यांना भाजपमध्ये आदर मिळाला नाही 

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिची खंत

मुंबई – कॉंग्रेस प्रवेशासाठी सज्ज झालेले भाजपचे खासदार आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या निर्णयाचे त्यांची अभिनेत्री कन्या सोनाक्षी हिने जोरदार समर्थन केले आहे. माझ्या वडिलांना आणि इतर ज्येष्ठ नेत्यांना भाजपमध्ये आदराची वागणूक मिळाली नाही, अशी खंत तिने व्यक्त केली आहे.

मागील काही काळापासून शत्रुघ्न सातत्याने मोदी सरकार आणि भाजपविरोधी भूमिका मांडत होते. त्यामुळे अपेक्षेनुसार बिहारमधून लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचे तिकीट भाजपने कापले. त्यानंतर शत्रुघ्न यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. लवकरच त्यांचा कॉंग्रेस प्रवेश निश्‍चित मानला जात आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, पत्रकारांनी येथे सोनाक्षीला वडिलांशी संबंधित घडामोडींबद्दल विचारले. कॉंग्रेसच्या साथीत वडील आणखी चांगले कार्य करतील असा विश्‍वास वाटतो. एखाद्या ठिकाणी तुम्ही आनंदी नसाल तर ते ठिकाण बदलायला हवे, अशी प्रतिक्रिया तिने दिली. वडिलांनी भाजपमधून खूप आधीच बाहेर पडायला हवे होते, अशी भावनाही सोनाक्षीने बोलून दाखवली.

Leave A Reply

Your email address will not be published.