कोल्हापूर (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री पदाचे किंवा मंत्रीपदाचे माझे स्वप्न नाही. महाराष्ट्र बळकट करणे हेच माझे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद द्या, असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेना उमेदवारांच्या प्रचारसभांना सुरवात केली. चंदगड मतदारसंघातील उमेदवार संग्राम कुपेकर आणि हातकणंगले मतदारसंघातील डॉ. सुजित मिनचेकर यांच्यासाठी सभा घेतल्या.
डॉ. मिनचेकर यांच्या प्रचारार्थ शिरोली येथे झालेल्या सभेत आदित्य ठाकरे यांनी मी दुष्काळ, प्रदूषण आणि बेरोजगार मुक्त महाराष्ट्राच स्वप्न बघतोय. मला सात-बारा कोरा करायचा आहे. त्यासाठी मला ताकद द्या, असे आवाहन केले. मी मुख्यमंत्री किंवा मंत्रिपदासाठी नव्हे तर नवा महाराष्ट्र घडवायला आल्याचही त्यांनी स्पष्ट केले.