मेलबर्न : माझ्या मुली क्रिकेटच्या चाहत्या आहेत. वेळ मिळेल तेव्हा मला गोलंदाजी करायला सांगतात व त्या फलंदाजी करतात, मात्र फलंदाजी करताना त्या भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या शैलीने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतात. त्या माझ्या मुली असून कोहलीच्याच फॅन आहे, असे सांगत आॅस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वाॅर्नरने कोहलीच्या लोकप्रियतेचे कौतूक केले.
घरात क्रिकेट खेळत असताना आपल्या मुली नेहमी विराट कोहलीचे नाव घेत असतात त्यावेळी मला लक्षात येते की कोहलीचा प्रभाव किती मोठा आहे, असेही वाॅर्नरने सांगितले.
An emotional @davidwarner31 accepts his third Allan Border Medal.
Great comeback, Bull! 🏅#AusCricketAward pic.twitter.com/VKUWaJ8m2V
— cricket.com.au (@cricketcomau) February 10, 2020
सर्वोत्तम आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू म्हणून वाॅर्नरला अॅलन बोर्डर पुरस्कारने नुकतेच गौरविण्यात आले आहे. चेंडू कुरतडल्याप्रकरणी त्याच्यावर एक वर्षाची बंदी लावण्यात आली होती. ही बंदी पूर्ण केल्यानंतर त्याने जागतिक क्रिकेटमध्ये धडाक्यात पुनरागमन केले व बोर्डर मेडल मिळविले.