नवी दिल्ली – अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष म्हणून डेमोक्रॅट नेते ज्यो बायडेन यांनी बुधवारी शपथ घेतली. तर, भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनीही पदाची शपथ घेत त्या देशाच्या पहिल्या महिला उपाध्यक्षा होण्याचा मान मिळवला. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बायडेन आणि कमला हॅरिस यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले कि, भारत-अमेरिकेतील संबंध समान मूल्यांवर आधारित आहे. आपल्याकडे भरीव असा बहुअंगी द्विपक्षीय अजेंडा आहे. जो आर्थिक गुंतवणुकीबरोबरच उत्साही लोकांसोबतचे संबंध वृद्धिंगत करत आहे. भारत-अमेरिकेतील भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी बायडेन यांच्यासोबत काम करण्यास कटिबद्ध आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल मी जो बायडेन यांचे अभिनंदन करतो. भारत-अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी मी बायडेन यांच्यासोबत काम करण्याची प्रतीक्षा करत आहे. अमेरिकेचे यशस्वी नेतृत्व करण्यासाठी माझ्या शुभेच्छा कारण, आपल्याला जागतिक शांतता आणि सुरक्षा पुढे नेण्यासाठी समान आव्हानांचा सामना करावा लागत आहे, असेही मोदींनी म्हंटले आहे.
The India-US partnership is based on shared values. We have a substantial and multifaceted bilateral agenda, growing economic engagement and vibrant people to people linkages. Committed to working with President @JoeBiden to take the India-US partnership to even greater heights.
— Narendra Modi (@narendramodi) January 20, 2021
बायडेन यांच्याबरोबर कमला हॅरिस यांचेही पंतप्रधान मोदी यांनी अभिनंदन केले आहे. उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतलेल्या कमला हॅरिस यांचं अभिनंदन. हा ऐतिहासिक क्षण आहे. भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आशादायी आहे. भारत-अमेरिका भागीदारी विश्वासासाठी फायदेशीर आहे, असे मोदींनी म्हंटले आहे.
Congratulations to @KamalaHarris on being sworn-in as @VP. It is a historic occasion. Looking forward to interacting with her to make India-USA relations more robust. The India-USA partnership is beneficial for our planet.
— Narendra Modi (@narendramodi) January 20, 2021