मुंबई – मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला एमआयएमचे नेते इम्तियाज जलील अनुपस्थित राहिल्याने शिवसेनेवर त्यांच्यावर टीका केली होती. परंतु या वर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ऑनलाईन उपस्थिती लावल्याने इम्तियाज जलील यांनी निशाणा साधला आहे.
इम्तियाज जलील म्हणाले कि, शिवसेनाप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमास येण्यास स्पष्ट नकार दिला, मराठवाड्याबद्दल माझ्या सचोटी आणि निष्ठेवर प्रश्न विचारणारे मुख्यमंत्र्यांना का विचारत नाही, यालाच मी दुहेरी मापदंड म्हणतो. मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमास माझी अनुपस्थिती म्हणजे राष्ट्र विरोधी आणि शिवसेनाप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची अनुपस्थिती म्हणजे देशभक्ती का? आता निष्ठेचे प्रमाणपत्र देणारे आणि मीडिया गप्प का आहे? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केले आहेत.
शिवसेनाप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमास येण्यास स्पष्ट नकार दिला, मराठवाड्याबद्दल माझ्या सचोटी आणि निष्ठेवर प्रश्न विचारणारे मुख्यमंत्र्यांना का विचारत नाही, यालाच मी दुहेरी मापदंड म्हणतो.
— imtiaz jaleel (@imtiaz_jaleel) September 16, 2020
दरम्यान, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री मुंबईतून ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले.