मुंबई : महाविकास आघाडीची आज पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेला खासदार संजय राऊत, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, अनिल देसाई उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमध्ये तिन्ही पक्षांकडून 85-85-85 जागांवर एकमत झाले असून बाकी जागांवर मित्रपक्षांसोबत चर्चा सुरु आहे असे या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्यात आले.
85-85-85 या जागांवर मिळून एकूण 270 जागांवर एकमत झालं आहे. उर्वरित 18 जागांवर शेकाप, कम्युनिस्ट, समाजवादी पक्षांसोबत चर्चा सुरु आहेत. उद्या या जागांवर आमच्यामध्ये स्पष्टता येईल. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढत आहोत. महाराष्ट्रात मविआचं सरकार येईल, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिल्या यादीत 65 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र तिन्ही पक्षांकडून काही नावांची घोषणा करण्यात आली असली तरी त्यामध्ये बदल होतील, असे संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले. आता मविआ 18 जागा कुणाला देणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.