MVA Press Conference । आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीत जागावाटपाविषयी सहमती झाल्याचे संकेत मिळत आहेत. महविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र येऊन आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामध्ये जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे सुखावलेल्या महाविकास आघाडीने विधानसभा रणसंग्रामाला सामोरे जाण्याची जय्यत तयारी सुरू केली. त्यातून आघाडीत जागावाटप निश्चित करण्याच्या उद्देशातून बैठकांचे सत्र सुरू झाले.
महाविकास आघाडीत नेमका वाद काय? MVA Press Conference ।
समोर आलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीत विदर्भातील काही जागांवरून मतभेत सुरु आहेत. या भागात काँग्रेसचे वर्चस्व जास्त आहे. त्यामुळे आम्हीच या भागात जास्त जागा घेणार असल्याची काँग्रेसची भूमिका आहे. या भागात काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 8 जागा देण्यासाठी तयार आहे. तर ठाकरे यांच्या पक्षाने या भागात एकूण 12 जागांवर दावा सांगितला आहे. या 12 जागांवर महाविकास आघाडीच्या घटकपक्षांचा आमदार नाही. त्यामुळे या जागा आम्हाला द्याव्यात, असे ठाकरेंच्या पक्षाचे मत आहे. याच कारणामुळे मविआतील घटक पक्षांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे,
पत्रकार परिषद कोण घेणार? MVA Press Conference ।
21 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी माहिती दिली आहे. “आमचं सगळं ठरलं आहे. उद्या जागा वाटप जाहीर होणार आहे,” अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली. 20 ऑक्टोबर रोजी शरद पवार, जंयत पाटील, संजय राऊत आणि अनिल देसाई यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीनंतर अनिल देसाई वरील माहिती दिली. त्यामुळे पत्रकार परिषद झालीच तर मविआचा जागावाटपाचा फॉर्म्यूला नेमका काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.