नवी दिल्ली – वाराणसी येथून जगातील सर्वात लांब नदीवरील “एमव्ही गंगा विलास’ या क्रुझ जहाजाला पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हिरवा झेंडा दाखवून त्याचे उद्घाटन करणार आहे. हे क्रुझ जहाज भारत आणि बांगलादेशातील पाच राज्यांमधील 3,200 किलोमीटरचे अंतर 51 दिवसांत पार करेल.पर्यटकांसाठी ही एक मोठी पर्वणी असेल.
बापरे! देवगडच्या ‘हापूस’ला सोन्याचा दर, 5 डझनच्या पेटीला ‘इतक्या’ हजाराची बोली
जागतिक वारसा स्थळे, राष्ट्रीय उद्याने, नदी घाट तसेच बिहारमधील पाटणा, झारखंडमधील साहिबगंज, पश्चिम बंगालमधील कोलकाता, बांगलादेशातील ढाका आणि आसाममधील गुवाहाटी या प्रमुख शहरांसह पर्यटन स्थळांना भेटी देऊन पर्यटन करणाऱ्यांसाठी या क्रूझचे नियोजन करण्यात आले आहे. गंगा विलासच्या पहिल्या प्रवासात स्वित्झर्लंडमधील 32 पर्यटक वाराणसी ते दिब्रुगड प्रवासाचा आनंद घेतील, असे निवेदनात म्हटले आहे.
हिंगोली: देवदर्शनासाठी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना विरोध, दोन गटातील वाद विकोपाला
क्रूझचा प्रवास वाराणसीतील प्रसिद्ध “गंगा आरती’पासून सुरू होईल आणि बौद्ध धर्मासाठी अत्यंत आदराचे ठिकाण असलेल्या सारनाथला ती जाईल. तांत्रिक हस्तकलेसाठी प्रसिद्ध मायोंग आणि माजुली या ठिकाणांनाही गंगा विलास हे क्रुझ भेट देणार आहे. यातील प्रवासी बिहार स्कूल ऑफ योगा आणि विक्रमशिला विद्यापीठालाही भेट देतील. हे जहाज बंगालच्या उपसागरातील सुंदरबन या जागतिक वारसा स्थळालाही जाणार आहे.
या प्रवासात महत्त्वाच्या प्राणी अभयारण्याचे दर्शन घडवले जाणार आहे. या संबंधात केंद्रीय बंदर, जहाजबांधणी मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले, गंगा विलास क्रूझ हे देशातील नदी पर्यटनाच्या प्रचंड क्षमतेला वाव देण्याच्या दिशेने टाकण्यात आलेले महत्वाचे पाऊल आहे. त्यामुळे भारत नदीच्या पर्यटनाच्या जागतिक नकाशावर येईल. यातून पर्यटकांना भारतातील जैवविविधतेची समृद्धता, तसेच आध्यात्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक समृद्धता अनुभवता येईल असे ते म्हणाले. गंगा विलास जहाजात तीन डेक आहेत, पर्यटकांसाठी त्यात 18 सुइट्स आहेत. त्यात अत्यंत विलासी सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत.