म्युच्युअल फंडांच्या गुंतवणूकदारात तब्बल 32.77 लाखांची वाढ

मुंबई: गुंतवणूकदारांच्या वाढत्या पसंतीमुळे जूनअखेरच्या तिमाहीत म्युच्युअल फंड गुंतवणूकदार खात्यांची संख्या विक्रमी अशा 7.46 कोटींवर गेली आहे. तिमाहीत 32.77 लाख नवीन फंड खाती जोडली गेली आहेत.

देशातील 42 फंड घराण्याचे नेतृत्व करणाऱ्या अँम्फीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जून 2018 या पहिल्या तिमाहीत 7,46,24,230 असे विक्रमी गुंतवणूकदार खाती (फोलियो) नोंदली गेली आहेत. मार्च 2018 अखेर असलेल्या 7,13,47,301 फंड खात्यांमध्ये पुढील तिमाहीत 32.77 लाख फंड खात्यांची भर पडली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 1.6 लाख कोटी गुंतवणूकदारांची भर पडली होती. यापूर्वीच्या पहिल्या दोन वर्षांत प्रत्येकी 50 लाखांहून अधिक गुंतवणूकदार खाती वाढली आहेत.

म्युच्युअल फंडातील समभाग तसेच समभाग संलग्न बचत योजनांचे खातेदार गेल्या तिमाहीत 26.41 लाखांनी वाढून 5.62 कोटी झाले आहेत. एकटया समभाग योजनांमध्ये 32,000 कोटी रुपयांची गुंतवणूक वाढली आहे. तर एकूण फंडांमध्ये 1.34 लाख कोटींचा निधी वाढला आहे. जून 2018 अखेर एकूण म्युच्युअल फंड निधी 23.40 लाख कोटी रुपये राहिला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या अर्थसाक्षरतेपोटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढत आहे. तसेच फंड गुंतवणुकीकडे विशेषत: छोट्या शहरांमधून रुपयांचा ओघ अधिक आहे. यामध्ये फंड संघटनेच्या प्रसार मोहिमेचा सिंहाचा वाटा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)