न्यूयॉर्क : फ्रान्समध्ये एका हल्लेखोराने अल्लाह हू अकबरचे नारे देत एका चर्चमध्ये हल्ला केला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये एका महिलेचाही समावेश होता. या महिलेचा गळा चिरुन हत्या करण्यात आली. या घटनेबाबत ट्वीट करताना आत्तापर्यंत झालेला रक्तपात पाहता लाखो फ्रेंच नागरिकांना ठार करण्याचा आणि आपला राग व्यक्त करण्याचा अधिकार मुस्लिमांना आहे असे मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी म्हटलं होतं. परंतु काही वेळानंतर त्यांनी आपलं ट्वीट डिलीट केले. त्यांच्या या ट्वीटनंतर फ्रान्सकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
“नुकतीच ट्विटर फ्रान्सच्या व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा झाली आहे. मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांचे ट्विटर खाते त्वरित निलंबित केले जाणे आवश्यक आहे. तसं नसल्यास ट्विटर हा हत्येच्या औपचारिक आवाहनाचा एक साथीदार ठरेल.” असे मत फ्रान्सच्या डिजिटल क्षेत्राचे राज्य सचिव कॅड्रिक ओ यांनी व्यक्त केले.
“फ्रान्सचा इतिहास पाहिला तर आजवर त्या देशानेही लाखो माणसं मारली त्यामध्ये अनेक मुस्लिम होते. फ्रान्सने घडवलेला रक्तपात पाहता मुस्लिम लोकांनी जर राग व्यक्त केला आणि माणसं मारली तर त्यांना त्याचा पूर्ण हक्क आहे,” असंही महाथिर यांनी म्हटलं होतं.
काही दिवसांपूर्वी फ्रेंच शिक्षकाची हत्या करण्यात आली. त्यानंतर गुरूवारी फ्रान्समधल्या चर्चमध्ये हल्ला झाला. या घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवला आहे. दरम्यान, मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी मुस्लिमांना लाखो फ्रेंच नागरिकांना मारण्याचा अधिकार आहे असे धक्कादायक ट्वीट या घटनेबाबत केले होते. मोहम्मद पैगंबरांच्या कार्टूनवरुन सुरु झालेल्या वादातून फ्रान्सच्या चर्चमध्ये चाकू हल्ला झाला करण्यात आला होता. यामध्ये एका महिलेसह तिघांची हत्या करण्यात आली आहे. ज्या हल्लेखोराने हत्या केली त्याने आधी अल्लाह हू अकबरचे नारे दिले. फ्रान्सच्या नीस शहरात असलेल्या चर्चमध्ये ही घटना घडली.