कोलंबो – ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या साखळी बॉंम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत मुस्लिम महिलांना बुरख्याने चेहरा झाकून घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी त्यांनी चेहरा पुर्ण दिसेल अशाच स्थितीने बुरखा घालावा असा स्पष्ट आदेश जारी करण्यात आला असून आज सोमवारपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
बॉंम्बस्फोटांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत सध्या आणिबाणी जाहीर करण्यात आली असून त्यातून मिळालेल्या अधिकारानुसार अध्यक्ष मैथरीपाला सिरीसेना यांनी हे नर्व निर्बंध लागू केले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेसाठी ही उपाययोजना करण्यात आली असून सुरक्षा दलांना कोणत्याही व्यक्तीचा चेहरा ओळखण्यात अडचण येणार नाही याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे असे राष्ट्राध्यक्षांच्यावतीने प्रसिद्धीला दिलेल्या आवाहन पत्रात नमूद करण्यात आले आहे.
समाजात सर्वंच धर्मपंथांचे शांततापुर्ण सह अस्तित्व असणे गरजेचे असून त्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेची बाब म्हणून ही उपाययोजना करण्यात येत असल्याचे या आदेशात करण्यात आले आहे. श्रीलंकेतील सर्वात अधिक लोकसंख्या असलेल्या धर्मियांमध्ये मुस्लिमांचे स्थान दुसऱ्याक्रमांकाचे असून त्यांची तेथील लोकसंख्या 10 टक्के इतकी असून ख्रिश्चनांची लोकसंख्या सुमारे सात टक्के इतकी आहे. हिंदुंची संख्या सर्वाधिक आहे.