पुणे – मुस्लिम सत्यशोधक मंडळ या मुस्लिम समाजातील सुधारणांसाठी कार्यरत असलेल्या संघटनेची नवीन कार्यकारीणी निवडण्यात आली असून मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. शमसुद्धीन तांबोळी यांची फेरनिवड करण्यात आली आहे. या मंडळाने नुकतेच 51 व्या वर्षात पर्दापण केले आहे.
अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये प्रा. सायरा मुलाणी, कार्यवाह प्रा. जमीर शेख, खजिनदार दिलावर शेख, सहकार्यवाह तमन्ना इनामदार, कार्यकारीणी सदस्य अल्ताफ हुसेन, जावेद शहा यांचीही निवड झाली.
मुस्लिम महिला मंचाच्या प्रमुख म्हणून डॉ. बेनझीर तांबोळी या काम पहातील. हे मंडळ मुस्लिम समाज प्रबोधन आणि संविधानात्मक मूल्यांवर नवसमाज निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे.