अमृता फडणवीस यांचे गाणे नव्हे वाद्य; सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘व्हेलेंटाईन डे’निमित्त नवे गाणे लॉन्च केले होते. या गाण्यामुळे अमृता फडणवीस नेटकऱ्यांच्या चर्चेत आल्या होत्या. यानंतर आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस चर्चेत आल्या आहेत.

अमृता फडणवीस यांनी एका व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये त्या एक पौराणिक वाद्य वाजवताना दिसत आहेत. या पोस्टला ‘डरते तो वो है जो अपनी छवि के लिए मरते है! मैं तो हिंदुस्तान की छवि के लिए मरता हूँ, इसी लिए किसी से भी नहीं डरता हूँ!- आदरणीय पंतप्रधान श्री, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

या व्हिडीओवरून अमृता फडणवीस पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.