दिल्ली : सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० किक्रेट स्पर्धेतील सुपर लीगला गुरूवारपासून सुरूवात होणार आहे. सुपर लीगमध्ये महाराष्ट्राची गुरूवारी दिल्लीशी लढत होणार आहे.
साखळी फेरीअखेर महाराष्ट्र संघ ‘क’ गटात अव्वल तर पंजाब व्दितीय स्थानावर राहिला होता. आता स्पर्धेतील सुपर लीगचे सामने सूरत येथे होणार आहेत.
🚨UPDATE🚨: It is time to move to the Super League stage of @Paytm #MushtaqAliT20. Following teams will now compete in Surat
A1 – Baroda
A2 – Karnataka
B1 – Tamil Nadu
B2 – Team Rajasthan
C1 – Maharashtra
C2 – Punjab
D1 – Mumbai
D2 – Haryana
E1 – Delhi
E2 – Jharkhand
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 19, 2019
स्पर्धेत ‘अ’ गटातून बडोदा व कर्नाटका, ‘ब’ गटातून तामिळनाडू व टीम राजस्थान, ‘क’ गटातून महाराष्ट्र व पंजाब , ‘ड’ गटातून मुंबई व हरियाणा तर ‘ई’ गटातून दिल्ली व झारंखड या संघानी सुपर लीग मध्ये प्रवेश केला आहे.
सुपर लीगमधील महाराष्ट्राच्या लढती :-
- २१ नोव्हेंबर – दिल्ली
- २४ नोव्हेंबर – बडोदा
- २५ नोव्हेंबर – राजस्थान
- २७ नोव्हेंबर – हरियाणा