बडोदा – देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेने रविवारी झाला.
स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात महाराष्ट्राला गुजराथकडून पराभव स्वीकारावा लागला.
अन्य सामन्यांत कर्नाटक, बडोदा, हिमाचल प्रदेश, तमिळनाडू, बंगाल, रेल्वे आणि पंजाब या संघांनी आपापले सामने जिंकून स्पर्धेत विजयी सलामी दिली.
प्रथम फलंदाजी करताना गुजराथने 20 षटकांत 8 बाद 157 धावा केल्या. त्यात कर्णधार अक्सर पटेलने 30 धावांची खेळी केली. महाराष्ट्राकडून मुकेश चौधरीने सर्वाधिक 3 गडी बाद केले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना महाराष्ट्राचा डाव 19.3 षटकांत 128 धावांवर संपुष्टात आला.
महाराष्ट्राकडून नौशाद शेखने सर्वाधिक 31 धावा केल्या तर, स्टार फलंदाज केदार जाधव केवळ 7 धावा काढून बाद झाला. बडोद्याकडून अर्झन नगवासवालाने 6 गडी बाद करत महाराष्ट्राच्या फलंदाजीला सुरुंग लावला.