पुणे – भांडणात मध्यस्थी केल्याचा राग आल्यामुळे टोळक्याने तरूणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून जीवघेण्या हल्ला केला. ही घटना २२ मे ला रात्री साडेसातच्या सुमारास विश्रांतवाडीतील आदर्श इंद्रिरानगरमध्ये घडली. याप्रकरणी तिघाजणांना अटक करण्यात आली आहे.
इरफान सय्यद (वय २६), रियाज मुजावर, मोहसीन शेख (सर्व रा. आदर्श इंद्रिरानगर, येरवडा ) अशी अटक करण्या आलेल्यांची नावे आहेत. प्रशांत अनिल परदेशी (वय २०, रा. आळंदी रस्ता, येरवडा ) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी आरोपी प्रशांतचा मित्र विष्णू मुदलीयारला मारहाण करीत होते. त्यामुळे प्रशांत भांडणात मध्यस्थी केली. त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने प्रशांतला धक्का देउन खाली पाडले. शिवीगाळ करून लाकडाने मारहाण करीत सिमेंटचा गट्टू डोक्यात मारून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नरळे तपास करीत आहेत.