दागिन्याच्या मोहापायी शेतात कामाला गेलेल्या महिलेचा गळा दाबून खून…

बुलढाणा – शेतात काम करणाऱ्या वृद्ध महिलेचा गळा दाबून निर्घृण खून केल्याची घटना लोणार तालुक्यातील भुमराळा येथील शिवारात घडली आहे. आरोपी चोरी करण्यासाठी गेला असता हा प्रकार घडला आहे.

कासाबाई नारायण चौधरी वय 65 असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. महिला उशीरापर्यत शेतातून घरी न आल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला. दरम्यान, काही नातेवाईक शेतात शोधत असताना सदर महिलेचा मृतदेह आढळून आला.

आरोपीने महिलेच्या अंगावरील दागिने अक्षरशः ओरबडून व कानाचे लचके तोडून बळजबरीने नेले असल्याने दिसून आले. या महिलेच्या शरीरावर जखमेच्या खुणा आहेत या महिलेच्या अंगावर कानातील सोन्याचे रिंग पाच ग्रॅम कानातील सोन्याची फुले एक ग्रॅम हातातील चांदीच्या कडे, पाटल्या, मंगळसूत्र, पोत असे एकूण 56 हजार 500 रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहे.

मधुकर दत्ता मोरे या महिलेच्या नातवाने बिबी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा केला असून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पुढिल तपास पोलिस करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.