नोएडा – उत्तरप्रदेशच्या ग्रेटर नोएडा भागात दोन बांधकाम व्यावसायिकांची अज्ञात इसमांनी हत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.
सोमवारी रात्री हा प्रकार घडला. हे दोन्ही बांधकाम व्यावसायिक अजनारा ले गार्डन सोसायटीच्या बाहेर एका मोटार कारमध्ये बसले होते, त्यावेळी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात ते जागीच ठार झाले.
दलचंद शर्मा आणि अरुण त्यागी अशी त्यांची नावे आहेत. या हत्या प्रकारामुळे नॉयडा भागात मोठीच खळबळ माजली आहे. पोलिसांनी वेगळी पथके नेमून हल्लेखोरांचा शोध जारी केला आहे.
हत्या कोणत्या कारणावरून झाली याची माहिती मिळू शकलेली नाही. ठारे झालेले दोघेही एकमेकांचे व्यावसायिक भागीदारपण होते असे सांगण्यात येत आहे.