आळंदी : काळेवाडी चर्होली (बुद्रुक) येथे परप्रांतीय तरुणाचा धारदारशस्त्राने वार करून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
गुरुवारी (दि. 5) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली. सचिनकुमार लखींदर राय (वय 23, रा. काळेवाडी, चर्होली बु. मूळ रा. मुजरफ्फरपूर, बिहार) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी अज्ञातावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.