येरवडा – येरवडा कारागृहातून सुटलेल्या आरोपीचा अवघ्या काही तासात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना बुधवारी रात्री येरवड्यात घडली.नितीन शिवाजी कसबे (वय 22, रा. लक्ष्मीनगर येरवडा) या खून झाला असून याप्रकरणी येरवडा पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. येरवड्यात तीन दिवसात झालेला खूनाचा हा दुसरा गंभीर गुन्हा आहे. वाढत्या गुन्हेगारी सह खुणासारख्या गंभीर गुन्ह्यांच्यामुळे येरवडा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नितीन कसबे याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल होते. एका गुन्ह्यात सहा महिन्या पूर्वी येरवडा कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली होती. बुधवारी संध्याकाळी पॅरोल’वर त्याची मुक्तता करण्यात आली. घरी आल्यानंतर मित्रासह बहिणी कडे जात असताना शादल बाबा चौकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज कमानीच्या अज्ञात हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर वार केले.
गंभीर जखमी अवस्थेत त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या डोक्यावर, हातावर, पायावर वार करण्यात आले होते. घटनास्थळी पोलिसांसह होण्यासाठीचे पोलिस दाखल झाले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची रोड पोलिसांनी सुरू केले आहे. तपास पोलिस निरीक्षक अजय वाघमारे करीत आहे.