डांगे चौक येथे तरुणाचा खून

पिंपरी  तरुणाच्या डोक्‍यात अज्ञात वस्तूने मारून त्याचा खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि. 23) सकाळी डांगे चौक, थेरगाव येथे उघडकीस आली.

रोहन दिलीप कांबळे (वय 30, रा. धायरी, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील दिलीप शंकर कांबळे (वय 60) यांनी गुरुवारी (दि. 23) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मयत रोहन हा बुधवारी रात्री डांगे चौक येथील एका दारूच्या दुकानातून दारू पिऊन बाहेर पडला. गुरुवारी सकाळी रोहन याचा मित्र संदीप जाधव याने दिलीप कांबळे यांना फोन केला. तुमचा मुलगा डांगे चौक येथे पडला असून त्याच्या नाकातोंडातून रक् येत असल्याचे सांगितले. दिलीप कांबळे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता पोलिसांनी रोहन याला वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदन अहवालत रोहन याच्या डोक्यात अज्ञात वस्तूने प्रहार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.