पुणे – पुण्यातील सिंहगड परिसरात महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मोना मदने असे मृत महिलेचे नाव आहे.
सिंहगड रस्त्यावरील तुकाईनगरमधील मोना मदने अवैध धंद्याविरोधात वारंवार पोलीस स्टेशनला तक्रार देत होत्या. याचाच राग मनात धरून अज्ञातांनी मोना यांचा खून केला. पोलीस घटनास्थळी पोहचले असून पोस्टमार्टम करण्यासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस अधिक तपास करत आहेत.