दुचाकीतील पेट्रोल चोरी करत असताना केली मारहाण
पुणे : दुचाकीतून पेट्रोल चोरी करणाऱ्या व्यक्तीचा मारहाणीत जागीच मृत्यू झाला. प्रशांत ढाकणे (वय.40,रा. डुक्कर खिंड वारजे, मुळ बीड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
हा प्रकार वारजे महामार्ग डुक्कर खिंड येथे सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडला. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.