आंबेठाण (वार्ताहर) – भांबोली तालुका खेड येथे क्षुल्लक कारणावरून एकाचा विहिरीत ढकलून खून करण्यात आला आहे.
भांबोली येथे काल दुपारी तीन वाजता सात-आठ मित्र दारू पिण्यासाठी एकत्र बसले होते. दारू पिताना मयत व आरोपी यांच्यामध्ये काहीतरी शाब्दिक वाद निर्माण झाला. त्याचा राग मनात धरून आरोपी योगेश पडवळ राहणार भांबोली तालुका खेड याने मयत दिलीप घावटे याला विहिरीत ढकलून खून केला.
सदर घटनेची फिर्याद गणपत विष्णू घावटे यांनी महाळुंगे इंगळे पोलीस चौकीत दिली असून आरोपीला तात्काळ अटक करून भा. द.वि.क.302 प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी करत आहेत.