पिंपरी –मुलीला आलेले स्थळ नाकारले म्हणून पतीला मारहाण तर पत्नीचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जितेंद्र राजेंद्र गिरी, सतिश श्याम पुरी यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीसोबत लग्नासाठी आरोपी जितेंद्र याचे स्थळ आले होते. मात्र फिर्यादी यांच्या पतीने याला नकार दिला यावरून फिर्यादी यांचे पती व जितेंद्र यांच्यात बाचाबाची झाली. शिवीगाळ करत आरोपींनी पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पीडितेलाही आरोपीने धक्काबुक्की केली. यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.