हमीरपुर – उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात एका मद्यधुंद पित्याने आपल्या 20 वर्षाच्या मुलीचा चाकू भोकसून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रमेश प्रजापती असे खून करणाऱ्या पित्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, रमेश प्रजापती हा मद्यपी असून त्याने शेजारच्या काही लोकांना देखील धमकावण्याचा प्रयत्न केला. सध्या त्याला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
हमीरपूर एसपी नरेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, नशेत असताना कोणताही पिता इतका क्रूर असू शकतो, ही गोष्ट विचार करण्यापलीकडे आहे. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. आरोपीला अटक केली असून चौकशी सुरु आहे.