पुणे – किरकोळ वादातून एकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना लष्कर भागातील बाबाजान चौकात घडली. याप्रकरणी एकाला अटक झाली.
ओबेद मुजफर कुरेशी (वय 30, रा. भीमपुरा, लष्कर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नबील शब्बीर बेलीम (रा. भीमपूरा, लष्कर) याला अटक केली. ओबेदचा मावस भाऊ मोहंमद कुरेशी (वय 30) याने यासंदर्भात लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
ओबेद कुरेशी बाबाजान चौकाजवळ खाद्यपदार्थ विक्रीची गाडी लावतो. शुक्रवारी (16 ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कुरेशी आणि बेलीम यांच्यात किरकोळ वाद झाला. कुरेशीने बेलीम याला शिवीगाळ केली. काही वेळानंतर बेलीम पुन्हा तेथे आला.
बेलीमने कुरेशीवर चाकूने वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कुरेशीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण हजारे तपास करत आहेत.