बारामती (प्रतिनिधी) – बारामती कोविड रुग्णालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांच्या रूपाने मुन्नाभाई एमबीबीएस अवतरल्याची प्रचिती येथील कोरोना संक्रमित रुग्णांना आली.
कोणत्याही आजारावर जितका औषधं उपचार जितका महत्वाचा असतो. तितकाच रुग्णांचा आत्मविश्वास देखील महत्वाचा असतो. मात्र एखादा आजार झाल्यानंतर आत्मविश्वास हरवून बसलेल्या लोकांचा आत्मविश्वास जागृत कसा करावा आणि त्याचा परिणाम काय होतो हे पटवून देणारा संजय दत्तचा “मुन्नाभाई एमबीबीएस” हा सिनेमा आपण सगळ्यांनी पहिला असेल.
अगदी तशाच पद्धतीने बारामतीच्या कोविड रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या किशोर मासाळ आणि इतर काही रुग्णांनी… वृद्ध रुग्णांचा आत्मविशास वाढविण्यासाठी.. डान्स, गाण्याची मैफिल, रंगवली कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांनी आपले दुःख बाजूला ठेवून हिंदी मराठी गाण्यावर नृत्य केले.
मनोधैर्य खचलेल्या वृद्ध कोरोना संक्रमित रूग्णांना सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम किशोर मासाळ यांनी बारामती कोविड रुग्णालयात केले. त्यांनी कोवीड रुग्णालयात राबविलेल्या युक्तीचे शहरात कौतुक होत आहे.