Bihar | Doctor – बिहारमध्ये एक धक्कादायक घटनेत कथित डॉक्टरने यूट्यूब व्हिडीओ पाहून 15 वर्षांच्या मुलाचे किडनी स्टोनचे ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे त्या मुलाची तब्येत बिघडली. यानंतर त्या मुलाला रुग्णवाहिकेतून पाटणा येथे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मात्र रस्त्यात असताना त्या मुलाचा मृत्यू झाला.
ही घटना छपरा मधील गडखा येथील मोतीराजपूर येथील श्री गणपती सेवा सदनच्या नर्सिंग हॉस्पिटलमध्ये घडली. अजित कुमार पुरी असे या कथित डॉक्टरचे नावआहे. या घटनेनंतर कथित डॉक्टर आणि त्याचे साथीदार फरार झाले आहेत. मुलाचा मृत्यू झाल्यानं त्याचे कुटुंबीय आक्रमक झाले होते.
सारण जिल्ह्यातील गडखा भागातील कथित डॉक्टर अजित कुमार पुरी याने यू ट्यूब व्हिडीओ पाहून मुलावर किडनी स्टोनचं ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला. मुलाच्या नातेवाईकांनी दावा केला की डॉक्टर मोबाइलवर व्हिडीओ पाहत होता आणि ऑपरेशन करत होता.
जेव्हा मुलाची प्रकृती बिघडली तेव्हा त्याने स्वत:रुग्णवाहिका बोलावून घेतली आणि पाटणाकडे रवाना झाला. मात्र, रस्त्यातच मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला.
या घटनेत भुवालपूर येथील चंदन साह यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुलाच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. तर, अजित कुमार पुरी आणि त्याचे इतर साथीदार फरार झाले.
त्यामुळे रुग्णांनी कोणत्याही वैद्यकीय सेवेचा लाभ घेताना अधिकृत डॉक्टरांकडे जावं. बोगस डॉक्टरांपासून लोकांनी सावध राहणं आवश्यक आहे असे आता प्रशासनाकडून सांगितले जाते आहे.