मुंबई – मुन्ना भैय्या आणि गुड्डू पंडित यांच्या हाणामारीला मिस करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. मिर्झापूरचा तिसरा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिर्झापूरच्या नव्या सिजनचे शूटिंग पूर्ण झाले असून नव्या वर्षी अर्थात २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला हा सीजन येणार आहे.
View this post on Instagram
श्रिया पिळगावकर,दिव्येंदु,पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, अशी दमदार स्टार कास्ट असल्यामुळे मिर्झापूरच्या दोन्हही सिजनला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. यातील मुन्ना भैय्याची शिव्या देण्याची स्टाईल असो वा गोलूची हटके फायटिंग असो चाहत्यांना प्रत्येक गोष्ट आवडली होती. यामुळेच चाहत्यांना तिसऱ्या सीजनची उत्कंठा लागली आहे.
View this post on Instagram
अभिनेता अली फजल अर्थात गुड्डू पंडितने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्याने मिर्झापूर ३ चे शूटिंग पूर्ण झाल्याचे समजते. त्यामुळे आता या सिजनबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये श्वेता त्रिपाठी देखील दिसत आहे. तिनेही ‘गोलू’ची शूटिंग दरम्यानची एक झलक शेअर केली आहे.