“त्या’ प्लॉटसाठी पैसे देण्यास पालिकेचा नकार 

नगर – सावेडीतील तपोवन रस्त्याला अडथळा ठरणारा प्लॉट विकत घेणार का असा सवाल न्यायालयाने महानगरपालिकेला केला होता. याबाबत महापालिकेत विशेष सभा घेवून यासभेत त्या प्लॉट मालकास पैसे देण्यात नकार दर्शविला. व ती जागा पालिका हद्दीत नाही. त्यामुळे पालिकेने त्यांना एक पैसे द्यावे प्रश्‍न उपस्थित करत नकार दर्शविला. व तसा ठराव पालिकेने सभेत केला आहे.

महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभेत टीपीमध्ये एखादी परवानगी घेण्यासाठी मोठा वेळ लागतो. तेथील प्रकरणे दिल्लीला परवानगीसाठी पाठविली जातात का? असा सवाल नगरसेवक कुमार वाकळे यांनी उपस्थित केला. बोल्हेगावमधील एका शाळेत पाणी घुसले. ते काढण्यासाठी महापालिकेकडे सक्षम यंत्रणा नाही. त्यामुळे संबंधित जमीन प्लॉटधारकाला पैसे देण्याऐवजी महापालिकेची यंत्रणा सक्षम करण्यासाठी तो पैसा खर्च करावा, असे त्यांनी सांगितले.

महापालिकेत दिवसेंदिवस ढिसाळ कारभार सुरू असल्याचे महापौर वाकळे यांनी सांगितले. महापालिकेत काम न करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. निम्मी महापालिका घरी गेली तरी हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेचे अभियंता जोशी यांनी संबंधित प्लॉटधारकाला टीडीआर वाढवून देऊन भूसंपादन करू, असे सांगितले होते. मात्र, त्यांनी असमर्थता दर्शवली. टीपीमधील अधिकारी नगरसेवकांना पूर्ण माहिती देत नाहीत. जेथे न्यायालयाचे आदेश असतात ते प्रकरण अभियंता जोशी मनावर घेत नाहीत.

मात्र, दुसरीकडे नागरिकांची अडवणूक करत ब्लॅकमेल करतात का, असा सवाल नगरसेवक कुमार वाकळे यांनी उपस्थित केला. सावेडी उपनगर, गावडे मळा येथील ले-आऊट करताना अनेकांनी नाले बुजवले होते. संबंधितांना महापालिकेने नोटीसा बजावून चौकशीचे आदेश दिले होते. त्याचे काय झाले? काल झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरांत पाणी घुसले, असेही नगरसेवक डॉ. सागर बोरुडे म्हणाले. त्या प्लॉटची संपूर्ण इतिहास काढा, तो तपोवन रस्त्याच्या मधोमध कसा काय आला, मागे ओढा असल्याने तो पुढे सरकला आहे. जर महापालिकेने संबंधित रस्त्याच्या भूसंपादनासाठी पैसे दिले तर मी या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)