पुणे – गणेशोत्सव अवघ्या 2 आठवड्यांवर नदीकाठ परिसरात असलेले विसर्जन हौद स्वच्छ करण्यास पालिकेकडून सुरूवात करण्यात आली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात दरवर्षी सुमारे साडेचार लाख गणेशमूर्तींचे विसर्जन होते. त्यासाठी मुळा-मुठा नदीच्या काठावर 22 घाट असून यासह शहरात इतर ठिकाणी 46 बांधलेले हौद आहेत. त्यांच्या स्वच्छतेचे काम घनकचरा व्यवस्थापन विभागाने सुरू केले आहे.
गणेश विसर्जनानंतर या हौदांत कचरा साठू नये, याची खबरदारी घेत हे हौद मुरूम तसेच मातीने भरले जातात. त्यानंतर गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी ही माती बाहेर काढून हे हौद पुन्हा पाण्याने भरले जातात. आता प्रशासनाने या हौदांची स्वच्छता सुरू केली असून त्यातून माती काढण्यात येत आहे. त्यानंतर हौद स्वच्छ करून त्याची रंगरंगोटी केली जाणार आहे.गणेशोत्सवासाठी