स्वच्छ सर्वेक्षणासाठी “पालिकेचं ठरलंय’

आयुक्तांच्या उपस्थितीत मेगा मीटिंग : पूर स्थितीचाही आढावा

पुणे – अतिवृष्टीमुळे कात्रज, अरण्येश्‍वर, पद्मावती, सहकारनगर, बिबवेवाडी या भागात झालेल्या पूरपरिस्थितीत बाधितांना मदत करण्यासाठी तसेच परिस्थिती सावरण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्था, नागरिक, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केलेली मदत मौलिक होती तसेच ती बाबही प्रेरणादायी होती, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शनिवारी केले.
महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने “स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत मेगा मीटिंगचे आयोजन करण्यात होते. यावेळी उपायुक्त माधव देशपांडे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पूरस्थितीत ज्या संस्था, व्यक्तींनी बाधितांना मदत केली त्यांचा सत्कार आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला.

स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या अंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. दैनंदिन कामकाज करताना काही ठिकाणी कचरा, घाण निदर्शनाला येते. त्यामुळे खंत निश्‍चित वाटते. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत निकषांवर लक्ष केंद्रित करुन नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी

20 प्रश्‍नांबाबत जागृती होणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांनी “व्हिजन शून्य ते शंभर’ आणि “प्लॅस्टिक बंदी’बाबत मार्गदर्शन केले.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सह आयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2020बाबत माहिती दिली. उपस्थितांनी स्वच्छता शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आरती दळवी यांनी केले, तर डॉ. केतकी घाडगे यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.