वैद्यकीय महाविद्यालयांना पालिकेचे साकडे

अंतिम वर्षाचे विद्यार्थी मदतीसाठी देण्याची मागणी

पुणे – मुंबईच्या धर्तीवर आता पुण्यातही महापालिकेच्या मदतीसाठी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तिसऱ्या आणि चौथ्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्‍टरांना बोलवण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांशी पालिकेने पत्रव्यवहार केला असून किती विद्यार्थी तयार आहेत, तसेच त्यांना किती मानधन हवे आहे याची माहिती पालिकेने मागविली आहे, असे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे सांगितले आहे.

शहरातील सक्रिय करोनाबाधित दुप्पट होण्याचा कालावधी 40 दिवसांवर आला आहे. तर सुमारे 2,500 सक्रिय बाधित शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. त्यांच्यावर उपचार तसेच विलगीकरणातील संशयितांची वैद्यकीय तपासणी आणि घरोघरी जाऊन “हायरिस्क’ रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी महापालिकेकडे आवश्‍यक प्रशिक्षित मनुष्यबळ तसेच डॉक्‍टरच नाहीत.

तर शासनानेही खासगी डॉक्‍टरांच्या सेवा अधिगृहित केल्या आहेत. मात्र, त्यानंतरही पुढील काही काळात प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळाची गरज असणार आहे. ते उपलब्ध व्हावे, यासाठी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना मदतनीस म्हणून घेण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.