तुंबलेल्या ड्रेनेजचे काम करायला पालिका कर्मचाऱ्यांनी मागितले पैसे ?

हडपसर : ससाणेनगर येथील चौकात ड्रेनेज तुंबून घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. तुंबलेल्या ड्रेनेजचे काम करावे यासाठी पालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयात संपर्क करण्यात आला. तेव्हा आज रविवार सुट्टी असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. नंतर पाठवून दिलेल्या पालिका कर्मचाऱ्यांनी आज सुट्टी आहे. ड्रेनेजचे काम करायचे असेल तर चहापाणी म्हणून पाचशे -हजार रुपये द्या, अशी मागणी ड्रेनेज तुंबल्याची तक्रार करणाऱ्या स्वप्निल डांगमाळी यांच्याकडे केल्याचा आरोप डांगमाळी यांनी केला आहे.

ससाणेनगर रस्त्यावर एका चौकात ड्रेनेज तुंबले आहे. यामुळे ड्रेनेजमधून घाण पाणी रस्त्यावर पसरले आहे. या घाण पाण्यावरून दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय ड्रेनेजचे पाणी  पादचारी आणि दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर उडत आहे.

ड्रेनेज तुंबल्याची माहिती पालिका अधिकारी मुल्ला यांना यांना देण्यात आली, मात्र त्यांनी पाठवलेल्या कर्मचाऱ्यांनी हे ड्रेनेजचे काम करण्यास आज रविवार सुट्टी असल्याचे कारण सांगितले. काम करायचे असेल तर आम्हांला चहापाणी म्हणून पाचशे- हजार रुपये देण्याची  मागणी केल्याचा स्वप्निल डांगमाळी यांनी केला आहे.

कर्मचाऱ्यांना पैसे देण्यासाठी आपण भीक मागत असून, सोमवारी हडपसर क्षेत्रिय कार्यालयात अधिकाऱ्यांना जमा रक्कम देण्यात येईल, असे डांगमाळी म्हणाले.

याबाबत पालिका कनिष्ठ अभियंता ए. आर. मुल्ला यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ड्रेनेज तुंबल्याची तक्रार डांगमाळी यांनी आपल्याकडे केली आहे. त्यानुसार ठेकेदारचे दोन कर्मचारी काम करण्यासाठी पाठवले होते. मात्र कामाची तीव्रता पहाता येथे गाडी मागवून सफाई करावी लागणार आहे. या कामासाठी कोणीही पैसे मागितले नाहीत.

पालिकेच्या नावाने भीक मागून केले पैसे गोळा
याबाबत तक्रारदार स्वप्निल डांगमाळी यांनी ” ससाणेनगर येथील सिग्नल चौकात मनपाच्या नावाने भीक मागून पैसे जमा केले. तसेच जमलेले पैसे उद्या सकाळी हडपसर क्षेत्रिय कार्यालयात जमा करणार असल्याचे डांगमाळी म्हणाले.

दरम्यान आपत्कालीन कामासाठी पालिका अधिकारी आणि कर्मचारी २४ तास बांधील असतात. त्यात रविवारी सुट्टीचा विषयच येत नाही. पगाराव्यतिरिक्त पालिका कर्मचारी असा कामांना पैसे मागत असतील तर भीक मागूनच पैसे द्यावे लागतील, असा शब्दात नगरसेवक योगेश ससाणे यांनी संताप व्यक्त केला. आपणही सकाळी येथे ड्रेनेज तुंबल्याची तक्रार केली होती. मात्र ती सोडविण्यात आली नाही. त्यामुळे शेवटी अशी आंदोलन केली जातात. पालिका कर्मचारी अशा कामांना पैसे मागत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे वारंवार येत असल्याचे नगरसेवक

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.