नगर – शिवसेनेच्या नगरसेविका सारिका भुतकर यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले. प्रभाग क्रमांक- 6 “अ’ मधील जागा रिक्त झाली. अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गासाठी ही जागा राखीव असल्याने या जागेवर पोटनिवडणुकीची तयारी सुरू झाली असून, आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 27 डिसेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द होणार आहे.
पोटनिवडणुकीसाठी 4 ऑक्टोबर रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्याआधारावर तयार करण्यात येणाऱ्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 27 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध होणार आहेत. यादी प्रसिध्द झाल्यानंतर 3 जानेवारी 2020 पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत आहे. प्रभागनिहाय मतदार याद्या व मतदान केंद्रांच्या याद्या 8 व 9 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
तर अंतिम मतदार याद्या 11 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, शिवसेना नगरसेविका सारिका भुतकर यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले होते. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गासाठी ही जागा राखीव आहे. या जागेवर पोटनिवडणुकीची तयारी सुरू झाली असून, आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.