शेतमाल विक्रीसाठी नगरपरिषदेने जागा द्यावी

शिरूर – शिरूर शहरातील सरदार पेठ परिसरात भाजीपाला विक्रीसाठी बसणारे शेतकरी यांना अरेरावी करून त्रास देणाऱ्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी व शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना जागा द्यावी, या मागणीचे निवेदन शिरूर शिवसेना व युवा सेनेच्या वतीने नगरपरिषदेचे गायकवाड यांना देण्यात आले.

नगरपरिषद कर्मचाऱ्यांना समज द्यावी या मागणीसाठी शिरूर शहर युवासेना व शिवसेनेच्या वतीने नगर परिषदेत निवेदन देण्यात आले. यावेळी माजी शहर प्रमूख बलराज मल्लाव, नगरसेविका अंजली थोरात, नगरसेवक मंगेश खांडरे, कैलास भोसले, शहर संघटक राजेंद्र शिंदे, मयूर थोरात, युवासेना अधिकारी सुनील जाधव, रूपेश राकेचा स्वप्नील रेड्डी भाजपा विजय नरके, महेंद्र येवले, नंदू काळे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.