कोल्हापूर /प्रतिनिधी-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेच्यावतीने यंदाच्या दिवाळीची सुरुवात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रक्तदान शिबिराने करण्यात आली. आजच्या रक्तदान शिबिरात महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करुन रक्तदान श्रेष्ठदान ही उक्ती सार्थ केली.
कोल्हापूर महानगरपालिका रक्तपेढीच्यावतीने क्रीडा महर्षि मेघनाथ नागेशकर हॉलमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांची होती, कार्यक्रमास गटनेते शारंगधर देशमुख व अजित ठाणेकर, माजी महापौर हसिना फरास, अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, उप-आयुक्त निखिल मोरे, सहाय्यक आयुक्त संदिप घार्गे, आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ यांच्यासह अनेक मान्यवर तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शासनाच्या आदेशानुसार कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा दिपावली उत्सव साध्या पध्दतीने, पर्यावरणपुरक, प्रदुषणमुक्त आणि फटाकेमुक्त साजरा करण्यावर महापालिकेने भर दिला असून दिपावली उत्सवादरम्यान अन्य सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन न करता रक्तदान शिबिर घेण्यात महापालिकेने प्राधान्य दिले. आजच्या रक्तदान शिबिराने दिपावलीची सुरुवात एक चांगल्या व समाजोपयोगी उपक्रमाने केली आहे. कोल्हापूर शहरातील नागरिकांनीही दिपावली उत्सव साध्या पध्दतीने, निरोगी, फटाकेमुक्त पध्द्तीने साजरा करावा. कसल्याही प्रकारे ध्वनी व वायुप्रदुषण होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे आवाहन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.
आजच्या रक्तदान शिबिराचे वैशिष्टय म्हणजे महापालिकेचे स्थायी समिती सभापती सचिन पाटील, गटनेते शारंगधर देशमुख यांनीही रक्तदान करुन इतरासमोर रक्तदानाचा आदर्श ठेवला. या रक्तदान शिबिरात शहरातील पत्रकारांनीही सहभाग घेतला.
याबरोबरच आजच्या रक्तदान शिबिरात महापालिकेच्या पन्नास वर्षावरील 5 जणांनी रक्तदान करुन अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यासमोर आदर्श निर्माण केला, यामध्ये राजाराम उलपे या 52 वर्षाच्या कर्मचाऱ्यांने आज पहिल्यांदाच रक्तदान केले, तसेच राजेंद्र मगदूम (वय 53), विलास साळोखे (वय 51), संजय भोसले (वय 51), तसेच विजय कुंभार (वय 54), यांनी रक्तदान करुन समाजासमोर एक आदर्श निर्माण् केला. या पाच जणांसह आजच्या रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केलेल्या सर्वांचे आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अभिनंदन करुन त्यांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
आजच्या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमास नगररचना सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संजना बागडी, रक्तपेढी अधिकारी सुरेंद्र शेलार, उपशहर अभियंता बाबुराव दबडे, हर्षदीप घाडगे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार , वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल माने, एलबीटीचे श्री. साळोखे, आसपाक आजरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आजच रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात रक्तपेढीचे डॉ. मनिष पाटील यांच्यासह कर्मचारी जस्मीन काझी, धनंजय गुरव, प्रतिभा धनवडे, स्वाती शेलार यांचे बहुमोल सहकार्य लाभले.