मनपाकडून प्लॅस्टिक कारवाईत पाच लाखांचा दंड वसूल 

नगर – शासनाच्या आदेशानुसार प्लॅस्टिक वापरावर बंदी असतानाही नगर शहरात खुलेआम प्लॅस्टिक विक्री व प्लॅस्टिकचा वापर सुरू आहे. त्यानुसार मनपाकडून कठोर अंमलबजावणी करण्यात येत असून, पथकाने दोन ते अडीच टन किलो प्लॅस्टिक जप्त करून 4 लाख 70 हजारांचा दंड वसूल केला आहे. त्यात अडथळा करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मनपाच्या या आक्रमक कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

या कारवाईमुळे आज व्यापारी असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना निवेदन दिले असून कारवाई शिथिल व व्यापाऱ्यांवर झालेले गुन्हे मागे घ्याण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मनपा आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. स्वच्छता सर्वेक्षणाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी व्दिवेदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.

यात प्लॅस्टिक बंदीविरोधात कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार मनपा प्रशासनाकडून शहरात कारवाई करण्यास सुरुवात झाली. याबाबत दररोज कारवाई करण्यात येत असून तब्बल 3 लाखांपर्यंतचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक जप्त करण्यात येत आहे. वदे मातरम युवा असोसिएशनने ही कारवाई शिथिल करण्याची मागणी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.