निगडी – महापालिका व लायन्स क्लब ऑफ पुणे आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने यमुनानगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. धर्मवीर संभाजी उद्यान ज्युबिली गार्डन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मनसेचे गटनेते सचिन चिखले, लायन्स क्लबचे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, सामाजिक कार्यकर्ते बापू घोलप, क्लबचे अध्यक्ष मोहन पाटील, सचिव अनिल दांदडे पाटील, विक्रम माने, राजेंद्र कोळी, श्रध्दा पेठे, सुजाता दांदडे गिता शर्मा, सत्यन भास्कर तसेच यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुशांत साळवी, आशीष दांदडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी ओमप्रकाश पेठे, सचिन चिखले, डॉ. बाहेती आदींनी मार्गदर्शन केले.