नगर – महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सलग तीन दिवस कारवाई करत वाडिया पार्क परिसरात अनधिकृत बांधण्यात आलेल्या “बी’ व “ए’ इमारत जमिनदोस्त केल्या. मनपाचा शनिवारी सुरु झालेला बुडलोझर सोमवारी (दि.16) सायंकाळी विसावला. त्यामुळे अतिक्रण विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांसह पोलीस बंदोबस्तात असलेल्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
नगरपालिकेने 1998 साली वाडिया पार्कची जागा क्रीडा संकुलासाठी जिल्हा क्रीडा संकुल समितीकडे हस्तांतरीत केली होती. जिल्हा क्रीडा संकुल समितीने ही जागा विकसीत करण्यासाठी समितीने जवाहार मुथ्था या ठेकेदाराला दिली होती.
मात्र, त्याठेकेदाराने पार्क साठी ठेवलेल्या जागेत अनाधिकृत “ए’ इमारतीत व “बी’ इमारतीत अनाधिकृत बांधकाम केले होते. याबाबत जिल्हाधिकारी यांनी ठोस निर्णय घेत मनपाच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी नियोजन करून शनिवारी सकाळीच वाडियापार्क परिसरातील अनधिकृत बांधकामावर एका पोकलेनच्या सहाय्याने जमिनदोस्त केली. ही कारवाई लवकर सुरु व्हावी यासाठी दुसरे पोकलेनची मदत घेवून दोन्ही इमारती सोमवारी सायंकाळी जमीनदोस्त केली.